इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; आजपासून करा अर्ज भरण्याचा सराव

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वाशिक, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. उर्वरित भागातील प्रवेश प्रक्रिया प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; आजपासून करा अर्ज भरण्याचा सराव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता ११ वी प्रवेशाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Class 11th Admission Process) राबवली जात असून माध्यमिक शिक्षण विभागातर्फे त्यासाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले (The schedule was released) आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वाशिक, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने (11th Admission Central Online Method) करण्यात येणार आहेत. उर्वरित भागातील प्रवेश प्रक्रिया प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. प्रवेशासाठी https://11thadmission.org.in पोर्टल देण्यात आले आहे. 

शिक्षण विभागाची पुर्वतयारी झाली असून विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांना प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या २२ ते २३ मे दरम्यान विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ Dummy Form भरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येईल. तर येत्या २४ मे पासून इयत्ता १० वी च्या निकालापर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरून तो व्हेरिफाय करून घेता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील माहिती महाविद्यालय किंवा मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून तपासून घेता येणार आहे. 
 
दरम्यान, २२ मे पासून इयत्ता १० वीचा निकाल जाहीर प्रसिध्द होण्याच्या तारखेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती शिक्षण उपसंचालक यांना ऑनलाईन प्रमाणित करता येणार आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्यास सुरुवाट होईल. निकालानंतर पाच दिवस विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यापासून पहिली फेरी ही १०-१५ दिवसांची असेल, दुसरी फेरी ७-८ दिवस, तिसरी फेरी ७-८ दिवस असणार आहे. त्यानंतर रिक्त जागांनुसार विशेष फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. पहिल्या विशेष फेरीनंतर ११ वी वर्ग सुरु होणार आहेत. 

विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा, इनाहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा आदी कोट्याअंतर्गत प्रवेश घेण्याबाबत आवश्यक सूचना संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.