IISER च्या प्रवेश प्रक्रियेत बदल, आता 'या' गुणांच्या आधारे होणार निवड 

या वर्षापासून आयसरचे प्रवेश हे केवळ आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट द्वारे होणार आहेत. जेईईचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

IISER च्या प्रवेश प्रक्रियेत बदल, आता 'या' गुणांच्या आधारे होणार निवड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) ने प्रवेश प्रक्रियेत बदल (Changes in admission process) केले आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेचे (JEE) चे गुण ग्राह्य धरले जात होते. मात्र, या वर्षापासून आयसरचे प्रवेश हे केवळ आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट (IAT) द्वारे होणार आहेत. त्यामुळे जेईईचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या या शिक्षण संस्थेच्या पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तुरुअनंतपुरम, कोलकत्ता, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसरची शैक्षणिक संकुले आहेत. विज्ञान आणि मानव्यविज्ञानातील पदवी, पदव्युत्तर, संशोधनातील चार वर्षांचा पदवी (बीएस) अभ्यासक्रम, पाच वर्षांचा पदव्युत्तर पदवी (बीएस-एमएस) हे अभ्यासक्रम येथे राबवले जातात. 

आयसर कोलकाताच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू म्हणाले,  आतापर्यंत जेईईचे गुण आयसरच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात होते. मात्र, यंदा जेईईचे वेळापत्रक जुळत नसल्याने आयसरचे प्रवेश केवळ आयसर ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.

आयआयएससीच्या प्रवेशांसाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतील (केव्हीपीवाय) गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. मात्र आता ही परीक्षा केंद्र सरकारने बंद केल्यामुळे आयआयएससीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करून आयसरच्या प्रवेश परीक्षेतून करण्याचा निर्णय झाल्याची माहिती डॉ. नातू यांनी दिली.