डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक समितीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. संस्थेच्या पुणे , मुंबई आणि सांगली या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत. त्यातच आता संस्थेचे 'डीईएस पुणे विद्यापीठ' स्थापन झाले आहे. त्यामुळे अनेकांचे या निवडणूकीकडे लक्ष होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक समितीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.16 ) केली. पुण्यातून चौदा, साताऱ्यातून तीन आणि मुंबई व सांगलीतून प्रत्येकी दोन सदस्यांचा नवीन परिषदेत समावेश आहे. मागील पंचवार्षिक परिषदेतील दहा सदस्यांची फेरनिवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांची मुदत डिसेंबर 2028 पर्यंत असणार आहे.

हेही वाचा : पुस्तकातून झाला 'भारत' शब्दाचा विश्व विक्रम

बिनविरोध निवड झालेल्या 21 सदस्यांची नावे पुढील प्रमाणे : 
राजश्री ठकार, रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, प्रमोद रावत, गणेश हिंगमिरे, शरद आगरखेडकर, मकरंद पाटील, अनिल भोसले, प्रीती अभ्यंकर, मिलिंद कांबळे, राजेंद्र जोग, विवेक मठकरी, अशोक पलांडे, अमित कुलकर्णी (सर्व पुणे), उषा मराठे, सुषमा घुमरे (दोन्ही मुंबई), अनंत जोशी, अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापुरे (सर्व सातारा) आणि विश्राम लोमटे, रवींद्र ब्रम्हनाळकर (दोन्ही सांगली).