इयत्ता 5 वी, 8 वी 9 वी आणि 11 वी च्या  बोर्ड परीक्षा रद्द; काय आहे कारण

उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे 13 ते 19 मार्च दरम्यान होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

इयत्ता 5 वी, 8 वी 9 वी आणि 11 वी च्या  बोर्ड परीक्षा रद्द; काय आहे कारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कर्नाटकातील आधीच्या भाजप सरकारने राज्य अभ्यासक्रमाच्या (State Curriculum) शाळांमधील इयत्ता  5 वी, 8 वी 9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकनाऐवजी (School level assessment) राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा (State Board Exams) घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील काही वर्षांपासून त्याप्रमाणे परीक्षा घेतल्याही जात होत्या. मात्र, आता कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) या परीक्षा रद्द (Examination cancelled) करण्याचा निर्णय घेतला आहे. 

न्यायमूर्ती रवी होसमनी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विनाअनुदानित खासगी शाळांच्या युनियनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करून हा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे 13 ते 19 मार्च या कालावधीत होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, 'शिक्षण विभागाचे परिपत्रक केवळ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू आहे. हा अभ्यासक्रमाचा भाग नाही. 

दरम्यान,कर्नाटक सरकारचा आणखीन एक निर्णय वादाचा मुद्दा ठरला आहे. परीक्षेदरम्यान, शाळा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही पुरवतात. परीक्षेनंतर विद्यार्थी प्रश्नपत्रिका घरी आणतात आणि उत्तरपत्रिका जमा करतात. मात्र, कर्नाटक सरकारने याबाबत पूर्णपणे वेगळा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इयत्ता 5वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घरून उत्तरपत्रिका आणावी लागणार आहे.

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर सर्व स्थरातून टिका होत आहे.