दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॅमेरे बसवण्याचे शिक्षण मंडळाचे निर्देश 

दिवाळीनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाच्या पथकाकडून राज्यात सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्राची मान्यता रद्द होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरातून रेकॉर्डिंग होणार असल्याने परीक्षा कॉफीमुक्त होतील असा विश्वास शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे. 

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॅमेरे बसवण्याचे शिक्षण मंडळाचे निर्देश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) १० वी १२ वी च्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक (It is mandatory to install CCTV at the examination center of 10th and 12th) असल्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  (Board of Secondary and Higher Secondary Education) बोर्डाच्या पथकाकडून राज्यात सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्राची मान्यता रद्द होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरातून रेकॉर्डिंग (Recording from CCTV camera) होणार असल्याने परीक्षा कॉफीमुक्त होतील,असा विश्वास राज्य शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे. 

दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळ अंतर्गत राज्याच्या चार ते पाच हजार केंद्रावर होतात. बोर्डाचे कॉफीमुक्त परीक्षेसाठी मागील वर्षापासून सर मिसळ पद्धत सुरू केली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याच्यावर हरकती मागवल्या असून त्यानंतर काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

सध्याच्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या काळात होणार असून या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोठी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत होईल. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होईल या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी पर्यंत होणार आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असायलाच पाहिजे. त्यानुसार सर्व केंद्रांना निर्देश दिले असून दिवाळीनंतर प्रत्येक केंद्राची नेहमीप्रमाणे पडताळणी होईल. त्यावेळी सीसीटीव्ही चालू स्थितीत आहेत का हे तपासले जाईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.