TCIL मध्ये नर्सिंग, फार्मासिस्टसह विविध पदांसाठी भरती सुरू, १३ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवार टीसीआयआय चे अधिकृत संकेतस्थळ www.tcil.net.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना २ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार असून १३ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

TCIL मध्ये नर्सिंग, फार्मासिस्टसह विविध पदांसाठी भरती सुरू, १३ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

टेलिकम्युनिकेशन कंसल्टंट इंडीया लिमिटेड मध्ये (TCIL) नर्सिंग, फार्मासिस्टसह विविध पदांसाठी (Nursing, Pharmacy Various Posts) भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) मागवण्यात येत आहेत. उमेदवार टीसीआयआय चे अधिकृत संकेतस्थळ www.tcil.net.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना २ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार असून १३ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत (September 13 deadline) देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये कंपनीतील विविध पदांच्या रिक्त जागांचा विचार केला जाणार असल्याने अगदी १० वी उत्तीर्ण पासून ते उच्च पदवीधर असणारे उमेदवारही या प्रक्रियेत सहभाग नोंदवू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराची 10वी/ 12वी/ ITIV B.Sc/ B.Pharm/ PG पदवी- डिप्लोमा होणे अनिवार्य आहे, त्याचबरोबर वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे वय २७ वर्षे /३० वर्षे / ३२ वर्षे असणे गरजेचे आहे. विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा तसेच शिक्षणाच्या अटीसंबंधित सखोल माहिती जाणून घेण्यासाठी TCIL च्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

TCIL साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला प्रथम tcil.net.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम रजिस्टेशन करावे लागेल. यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक ती माहिती भरून अर्ज सबमिट करावे. आकारण्यात आलेला अर्ज शुल्क भरून फॉर्म डाउनलोड करून भविष्यातील गरजेसाठी त्याची प्रिंट काढून ठेवावी लागेल.