'रोहित आर्या' कडे माजी शालेय शिक्षण मंत्र्यांचे चेक कसे ?
केसरकर यांनी वैयक्तिक "मदत" नाही तर 2023-24 च्या रोहित आर्याच्या 4 पैकी सर्वात कमी रक्कम असलेल्या 2 invoices साठी वैयक्तिक "sponsor" करत असल्याचे सांगून payment केले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पवई येथील इमारतीत लहान मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्याने (Rohit Arya)अनेक वेळा आंदोलन केले.त्यादरम्यान माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar)यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून रोहित आर्याला 8 लाख 26 हजार रुपयांचा धनादेश दिला असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, हा सर्व प्रकल्प शासकीय असताना केसरकर यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून रक्कम का दिली.याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे.
शासनाकडून पैसे मिळत नसल्याने केसरकर यांनी वैयक्तिक "मदत" नाही तर 2023-24 च्या रोहित आर्याच्या 4 पैकी सर्वात कमी रक्कम असलेल्या 2 invoices साठी वैयक्तिक "sponsor" करत असल्याचे सांगून payment केले होते. वैयक्तिक sponsor करण्याचे कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाही, परंतु, रोहित आर्यावर अन्याय होत असल्याने त्यांनी ही रक्कम दिली होती. केसरकर यांनी invoices clear करण्यासाठी वैयक्तिक sponsor केले होते. त्यानंतर त्याला उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, शासनाकडून त्याला बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवले होते.
शासनाकडून रक्कम मिळत नाही म्हणून रोहित आर्याने घेतेल्या निर्णयाचे कोणेही समर्थन करणार नाही. मुलांना ओलीस ठेवणे अत्यंत चुकीचे होते.मात्र, रोहित आर्याला त्याने केलेल्या कामाचे पैसे देण्यात आले होते किंवा नाही. तसेच रोहित आर्याने या प्रकल्पात पैशांचा काही गैरव्यवहार केला होता का याची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

eduvarta@gmail.com