पदवीधर बेरोजगारांसाठी 'पुणे पदवीधर' निवडणुक लढणार; प्रा. जोतीराम सोरटे
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सध्या सुरू आहे. निवडणूक नोव्हेंबर डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. या मतदार नोंदणीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार सध्या पदवीधर मतदार नोंदणी करण्यामध्ये व्यस्त आहेत. मागील आठ वर्षापासून सर्वच पदवीधरांच्या संपर्कात असून पदवीधर मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू केली असल्याचे प्रा. जोतीराम सोरटे यांनी सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, (Professor recruitment, teacher recruitment) शिक्षकेतर कर्मचारी भरती तसेच प्राथमिक शाळा बचाव, पवित्र पोर्टल भरती, पदवीधरांच्या वैयक्तिक पातळीवरील समस्या ह्या सर्वांचे मागील आठ वर्षापासून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासन सभागृहात वाचा फोडण्यासाठी पुणे पदवीधर निवडणूक (Pune Graduate Election) लढविण्याची तयार नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती (NET SET PhD Holders Struggle Committee) समन्वयक प्रा. जोतीराम सोरटे (Prof. Jotiram Sorte) यांनी दाखवली आहे.
प्राध्यापक भरती प्रक्रिया 'या' कारणांमुळे रेंगाळणार; पुन्हा जाहिरात द्यावी लागणार...
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सध्या सुरू आहे. निवडणूक नोव्हेंबर डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. या मतदार नोंदणीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार सध्या पदवीधर मतदार नोंदणी करण्यामध्ये व्यस्त आहेत. मागील आठ वर्षापासून सर्वच पदवीधरांच्या संपर्कात असून पदवीधर मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू केली असल्याचे प्रा. जोतीराम सोरटे यांनी सांगितले आहे.
अनेक आंदोलने, पदयात्रा, शासन स्तरावर प्रत्यक्ष पाठपुरावा, अधिकारी वर्ग यांच्याबरोबर बैठका तसेच प्रत्येक शैक्षणिक कार्यामध्ये मागील अनेक वर्षापासून आघाडी घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पदवीधरांच्या अनेक प्रलंबित प्रश्न संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे. येऊ घातलेली पदवीधर निवडणूक मोठ्या तयारीनिशी लढविण्याची तयारी प्रा. जोतीराम सोरटे यांच्याकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
eduvarta@gmail.com