JAM पदव्युत्तर पदवी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू
इच्छुक उमेदवार 11 ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइट jam2025.iitd.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतील. या वर्षी IIT JAM 2025 चे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली द्वारे केले जाणार आहे.
 
                                एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशभरातील IIT मध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत असणार्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पदव्युत्तर पदवी संयुक्त प्रवेश परीक्षा (Post Graduate Joint Entrance Examination) (JAM) 2025 साठी अर्ज प्रक्रिया IIT दिल्ली (IIT Delhi) 3 सप्टेंबरपासून सुरू (Start the application process) करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 11 ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइट jam2025.iitd.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतील. या वर्षी IIT JAM 2025 चे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT Delhi) द्वारे केले जाणार आहे.
अर्जाच्या तारखांसह आयआयटी दिल्लीने यापुर्वीच परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जानेवारी २०२५ मध्ये उपलब्ध करून दिली जातील. परीक्षेचा निकाल 16 मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे देशभरातील आयआयटीमध्ये एमएससी, एमटेक, पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
SC/ST/PWD श्रेणी वगळता इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी एका चाचणी पेपरसाठी अर्ज केल्यास त्यांना 1 हजार 800 रुपये आणि दोन्ही चाचणी पेपरसाठी अर्ज केल्यास 2 हजार 550 रुपये जमा करावे लागतील. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना एका पेपरसाठी 900 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्यास 1 हजार 250 रुपये द्यावे लागतील.
उमेदवार JOAPS पोर्टलवर अर्ज प्रक्रिया करू शकतील. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक तपशील भरून प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर इतर सर्व तपशीलांसह विहित शुल्क लॉगिनद्वारे जमा करावे लागेल. पूर्णपणे भरलेला अर्ज सबमिट करा आणि डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
 
                         eduvarta@gmail.com
                                    eduvarta@gmail.com                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                     
            
             
            
            