शाळेत शिकवला जाईल भगवद् गीतेचा धडा 

शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे.

शाळेत शिकवला जाईल भगवद् गीतेचा धडा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गुजरात सरकारने सरकारी शाळांमध्ये भगवद् गीतेचा सार शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळकरी मुलांना भगवद् गीतेचे सार शिकवण्यासाठीचा अभ्यासक्रम गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी प्रसिद्ध केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्याची अंमलबजावणी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

इयत्ता ६वी ते ८वी पर्यंतच्या शाळकरी मुलांना भगवद् गीता शिकवण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. या सत्रापासून सर्व सरकारी शाळांमध्ये मुले गीता वाचतील. त्यासाठी वेगळे  शिक्षक नेमण्याची गरज भासणार नाही. सामान्य माणूस ज्या पद्धतीने गीता वाचतो त्याच पद्धतीने ते शिकवले जाईल, असेही दिंडोर म्हणाले.

मुले शालेय जीवनापासूनच भगवद् गीतेचा धडा वाचतील आणि जीवन जगण्याची नवी पद्धत शिकतील. भगवद् गीता हे केवळ एका धर्माचे नसून सर्व धर्मांचे सार आहे. ही जीवन जगण्याची कला आहे, असा दावाही दिंडोर यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या सुरुवातीला गुजरात सरकारने नवीन सत्रापासून विद्यार्थ्यांना भगवद् गीता शिकवली जाईल, अशी घोषणा केली होती, मात्र अभ्यासक्रमाला अंतिम स्वरूप देण्यास उशीर झाल्यामुळे आता शाळेत दुसऱ्या सत्रापासून हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.