बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू, २१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी
१३ जुलैपर्यंत नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. १६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जामध्ये झालेल्या दुरूस्त्या सुधारण्यासाठी १७ ते १९ जुलै हा कालावधी दिली जाणारे आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (State Common Entrance Examination) औषधनिर्माणशास्त्र पदवी (B.Pharm degree) अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात (Admission process begins) झाली आहे. सीईटी सेलने याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ४ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १३ जुलैपर्यंत मुदत (Deadline until July 13) दिली आहे.
कृषी पदवीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, ३० जुलै रोजी गुणवत्ता यादी
त्यानंतर ५ जुलै ते १४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. १३ जुलैपर्यंत नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. १६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जामध्ये झालेल्या दुरूस्त्या सुधारण्यासाठी १७ ते १९ जुलै हा कालावधी दिली जाणारे आहे.
सर्व तक्रारींचे निवारण झाल्यानंतर २१ जुलै रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीवेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अथवा प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयांना देण्यात आला आहे.
eduvarta@gmail.com