कृषी पदवीची प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; ३० जुलैला गुणवत्ता यादी 

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये १७ हजार ७७६ जागा आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १५० जागा आहेत. दरम्यान पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी २६ जुलैला तर पहिली फेरी ३० जुलैला जाहीर होईल. 

कृषी पदवीची प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; ३० जुलैला गुणवत्ता यादी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (State Common Entrance Examination) एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या (Agriculture degree courses) पदवी प्रवेश प्रक्रियेला आज शुक्रवारपासून सुरुवात (Admission process begins) झाली आहे. या प्रवेशाची अंतरिम गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ३० जुलैला जाहीर (Merit list announced on July 30) होणार आहे.

BAMU : नॅक मुल्यांकनासाठी महाविद्यालयांकडे मागितला मासिक प्रगती अहवाल

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये १७ हजार ७७६ जागा आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १५० जागा आहेत. दरम्यान पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी २६ जुलैला तर पहिली फेरी ३० जुलैला जाहीर होईल. 

राज्यामध्ये बीएसस्सी कृषी अभ्यासक्रमासाठी १२ हजार १७८ जागा, उद्यानविद्या अभ्यासक्रमासाठी १ हजार १०४ जागा, बीटेक (कृषी अभियांत्रिकी) ८६४ जागा, बीटेक (अन्न तंत्रज्ञान) १ हजार ४४०, बीटेक (जैवतंत्रज्ञान) १०४० जागा, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ९४० जागा, बी. एसस्सी सामाजिक विज्ञान ६० जागा, बी.एसस्सी वनविद्या ८२ जागा आणि बी.एसस्सी मत्स्य विज्ञान ४० जागा आहेत.