शाळेतील मित्रासाठी मुलगा जोरात चावाला ; बुरखाधारी भुयारात पळाला  

रस्त्यात उभ्या असलेला एका बुरखाधारी व्यक्ती त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून जवळच असलेल्या भुयारी मार्गाकडे त्याला ओढू लागला.त्यामुळे या मुलाने आरडा ओरडा केला. त्याचा आवाज ऐकून त्या मुलांचे मित्र व शाळेतील इतर विद्यार्थी मदतीसाठी धावून आले.

शाळेतील मित्रासाठी मुलगा जोरात चावाला ; बुरखाधारी भुयारात पळाला  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विश्रातवाडी-आळंदी रस्त्यावर (Vishratwadi-Alandi Road) इयत्ता सातवीतील एका शाळकरी मुलाला (school boy) एका बुरखाधारी व्यक्तीने (A veiled degenerate) पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, या मुलांचे मित्र त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीसांकडे (Vishrantwadi Police) तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : तृतीयपंथीयांना द्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश
 
येरवडा येथील एका रिक्षा चालकाचा मुलगा विश्रांतवाडी- आळंदी  रस्त्यावरील भारत गॅस एजन्सी जवळील शाळेत नियमितपणे गेला. दुपारी शाळा सुटल्यावर तो घरी निघाला. मात्र रस्त्यात उभ्या असलेला एका बुरखाधारी व्यक्ती त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून जवळच असलेल्या भुयारी मार्गाकडे त्याला ओढू लागला.त्यामुळे या मुलाने आरडा ओरडा केला. त्याचा आवाज ऐकून त्या मुलांचे मित्र व शाळेतील इतर विद्यार्थी मदतीसाठी धावून आले.काहींनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला.तर एकाने त्यांच्या पाठीला चावा घेतला. तर दुसऱ्याने त्याला मारण्यासाठी दगड उच्चलला. त्यामुळे बुरखाधारी व्यक्तीने तेथून पळ काढला.ही घटना २ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

शाळकरी मुलाने घरी येऊन आपल्या आईला हा प्रकार सांगितला.आईने मुलांच्या वडिलाना फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर मुलांच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. तसेच घडलेली हकीकत सांगितली.बुरखाधारी अज्ञात व्यक्ती जवळच असलेल्या भुयारी मार्गात पळून गेला. त्यामुळे त्याला पकडता आले नाही.तसेच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप मिळाले नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्ती  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.