विद्यापीठ अधिसभा सदस्यांवर आंबेकरांनी आणला हक्कभंग; विद्यापीठाची बदनामी कारण्यावरून सभागृह तापले 

पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी पुरावे असतील तर आधी पोलिसांकडे तक्रार करावी.

विद्यापीठ अधिसभा सदस्यांवर आंबेकरांनी आणला हक्कभंग; विद्यापीठाची बदनामी कारण्यावरून सभागृह तापले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेत (senate )अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक उपकेंद्रासाठी (Nashik Sub Centre)अर्थसंकल्पात 13 कोटी रुपये मंजूर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे संबंधित सदस्यावर हक्क भंग आणावा व अधिसभेने या सदस्याचा निषेध करावा,असा स्थगन प्रस्ताव विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी सभागृहात मांडला.तसेच विद्यापीठाची बदनामी होईल,अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी पुरावे असतील तर आधी पोलिसांकडे तक्रार करावी,असेही आंबेकर यांनी सुनावले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अधिसभेच्या बैठकीत शनिवारी विद्यापीठाचा 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सादर करण्यात आला.यावेळी विद्यापीठाविषयी बदनामी करणाऱ्या अधिसभा सदस्यांवर हक्कभंग आणावा,असा प्रस्ताव आंबेकर यांनी सादर केला. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांचे नाव घेऊन त्यांचा निषेध केला.विद्यापीठात भ्रष्टाचार होत असेल तर त्यांनी पोलिसांमध्ये जावे.केवळ विद्यापीठावर दबाव आणण्यासाठी बदनामी कारक बातम्या पत्रकार परिषद घेऊन छापून आणल्या जातात,असा आरोपही आंबेकर यांनी केला. 

आंबेकर म्हणाले, विद्यापीठचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यातील गोपनीय माहिती प्रसार माध्यमांना सांगणे हा विद्यापीठ नियमावलीचा भंग आहे.त्यामुळे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी सभागृहात माफी मागावी. दरम्यान, सचिन गोरडे पाटील यांनी सुध्दा विद्यापीठाविरोधात पत्रकार परिषद घेतली होती .त्यावर आंबकर म्हणाले,विद्यापीठाची बदनामी करण्यापूर्वी पुरावे सादर करावेत.तसेच संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी. 

माझ्या १५ वर्षाच्या अनुभवात प्रथमच विद्यापीठाची अशी बदनामी बघत असल्याचे नमूद करून अधिसभा सदस्य अशोक सावंत म्हणाले, "सदस्यांकडे अधिसभेत किंवा कुलगुरूंकडे न्याय मागण्याची संधी आहे. असे असताना बदनामी करणे योग्य नाही.मात्र, सविस्तर चर्चा झाल्यानंतर या वादावर पडदा पडला.
---------------------------------------