महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ४३ वे अधिवेशन नांदेडला

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ४३ वे दोन दिवशीय अधिवेशन नांदेडला

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ४३ वे अधिवेशन नांदेडला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

नांदेड : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ४३ वे अधिवेशन नांदेड (Nanded) येथे होणार आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबर ते २४ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ट नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या हस्ते होणार आहे. 

या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गणेशराज सोनाळे आहेत. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुनिल श्रीवास्तव असणार आहेत. यावेळी आमदार विक्रम काळे, श्यामसुंदर शिंदे, मोहन हंबर्डे, माधवराव जवळगांवकर, जितेश अंतापूरकर, माजी आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर, माजी सभापती बालाजी पांडागळे, लातूरचे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, विभागीय सचिव सुधाकर तेलंग उपस्थित असणार आहेत. 

हेही वाचा : DPIIT परीक्षक भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध

शनिवार २३ डिसेंबर रोजी, गणित सर्वांसाठी या विषयावर रविंद्र येवले यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर गणिताचे तत्त्वज्ञान या विषयावर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच या सो रि ना का ? या विषयावर नागेश मोने यांचे व्याख्यान आहे. त्यानंतर NEP-2020 च्या दृष्टीकोनातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताचे स्थान या विषयावर डॉ. मनेश कोकरे यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री उपस्थित शिक्षकांसाठी वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकाचा प्रयोग साहेबराव पावडे सादर करणार आहेत. 

२४ डिसेंबरला राज्यस्तरीय गणित प्रस्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. त्यानंतर प्राचीन आणि आधुनिक गणितातील मनोरंजक कथा या विषयावर सुधीर घोरपडे यांचे व्याख्यान होणार आहे. नविन शैक्षणिक धोरणामुळे गणित शिक्षणात होणारे बदल या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप भाजप नेते व नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पुण्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे उपस्थित असणार आहेत.