शिक्षण क्षेत्रात खळबळ : पटसंख्या कमी झाल्याने झेडपीचे ३५ शिक्षक निलंबित 

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या घटण्यामागे शिक्षकांना जबाबदार धरण्यात आले असून ३५ शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने 35 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासाळल्याने अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात खळबळ : पटसंख्या कमी झाल्याने झेडपीचे ३५ शिक्षक निलंबित 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्रातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने ३५ शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन (35 suspension of teachers) करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Zilla Parishad School) वाढता विद्यार्थी संख्या घटनेचा दर हा राज्याला चिंतेत टाकणारा आहे. हा प्रकार शिक्षण विभागाच्या (School Education Department) लक्षात आल्यामुळे हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या घटण्यामागे शिक्षकांना जबाबदार धरण्यात आले असून ३५ शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने 35 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासाळल्याने अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केल्याने शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. मात्र, शिक्षक वर्गातून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळताना दिसून येत नसल्यामुळे हा कारवाईचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. 

बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या आणि शिक्षणााचा दर्जा चिंतेचा विषय बनला आहे. याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. 20 शाळांतील 35 शिक्षक निलंबित केले असून, 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामुळे मात्र शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.