वडिलांची निर्घृण हत्या, पण जिद्द सोडली नाही, संतोष देशमुखांच्या लेकीला NEET परीक्षेत घवघवीत यश..
वैभवीने बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवत आपल्या जिद्दीची झलक दाखवली होती, तर आता NEET सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून तिने सगळ्यांना आपला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वेभवीचे अभिनंदन केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिने अशा परिस्थितीमध्ये देखील नुकत्याच जाहीर झालेल्या NEET परीक्षेत (NEET Exam Result) घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वडीलांच्या निधनानंतर अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतही वैभवीने अभ्यासात लक्ष केंद्रित करून आपलं स्वप्न जिवंत ठेवलं. वैभवीने NEET परीक्षेत 147 मार्क्स (147 marks in NEET exam) मिळवले आहेत.
वैभवीने बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवत आपल्या जिद्दीची झलक दाखवली होती, तर आता NEET सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून तिने सगळ्यांना आपला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वेभवीचे अभिनंदन केले आहे.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली, तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परीक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

eduvarta@gmail.com