NCC मध्ये होणार 3 लाख कॅडेट्सचा समावेश, तर 20 लाख कॅडेट्सना मिळणार मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  NCC च्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

NCC मध्ये होणार 3 लाख कॅडेट्सचा समावेश, तर 20 लाख कॅडेट्सना मिळणार मंजुरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) मध्ये प्रशिक्षण घेऊन देशसेवेत रुजू व्हायचे असे अनेक युवांचे स्वप्न होते. पण या प्रशिक्षण संस्थेत असलेल्या मर्यादित जागांमुळे बऱ्याच लोकांना आपल्या स्वप्नांवर पांघरुन घालावे लागत होते. मात्र, या पुढील काळात असे होणार नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी  NCC च्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी (Approval of the proposal) दिली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता एनसीसीमध्ये 3 लाख कॅडेट्सचा समावेश (Including 3 lakh cadets) करण्यात येणार आहे. तसेच एनसीसीकडे आता 20 लाख कॅडेट्सची मंजूर (20 lakh cadets sanctioned) संख्या असेल.

 संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, "या विस्तारामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील एनसीसीची वाढती मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आता NCC  जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनवणारी संस्था असेल." NCC मध्ये 1948 मध्ये फक्त 20 हजार कॅडेट होते. विस्तार योजनेंतर्गत, चार नवीन "ग्रुप मुख्यालय" स्थापन केले जातील आणि दोन नवीन NCC युनिट्सचा समावेश केला जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार एनसीसीचा पर्यायी विषय म्हणून परिचय हे भविष्यात देशाचे भावी नेते म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. या विस्तारामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिक्त पदांचे समानुपातिक वितरण होईल आणि NCC साठी इच्छुक असलेल्या संस्थांची प्रतीक्षा यादी कमी होईल." विशेष म्हणजे या योजनेंतर्गत या सैनिकांना NCC  प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्तावही समाविष्ट आहे.