ऐकावे  ते नवलंच ! लाईव्ह क्लासमध्ये प्राध्यापकाने प्राध्यापिकेला केले प्रपोज ; व्हिडिओ व्हायरल 

ऑनलाइन एज्युकेटर अड्डा 247 चे प्राध्यापक नवनीत तिवारी यांनी थेट व्याख्यानादरम्यान त्यांची सहकारी सोना मॅडमला लग्नासाठी प्रपोज केले.

ऐकावे  ते नवलंच ! लाईव्ह क्लासमध्ये प्राध्यापकाने प्राध्यापिकेला केले प्रपोज ; व्हिडिओ व्हायरल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या प्रपोज करण्याचे, लग्नाची मागणी घालण्याचे अनेक फंडे प्रचलित होत आहेत. असाच एक प्रस्ताव सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओ (Viral vidio) मध्ये चक्क लाईव्ह क्लास (Live Class) सुरु असताना एका प्राध्यापकाने आपल्या सोबत काम करणाऱ्या प्राध्यापिकेला लग्नासाठी मागणी (Professor Proposes) घातली आहे. 

ऑनलाइन एज्युकेटर अड्डा 247 चे प्राध्यापक नवनीत तिवारी यांनी थेट व्याख्यानादरम्यान त्यांची सहकारी सोना मॅडमला लग्नासाठी प्रपोज केले. या लाईव्ह लेक्चरमध्ये, नवनीत तिवारी त्यांच्या सहकारी प्राध्यापिकेला म्हणतात, 'तुम्ही मला वैयक्तिकरित्या देखील सपोर्ट करता, आयुष्यभर तुम्ही मला असाच पाठिंबा दिलात आणि मुलांकडूनही एक मागणी आहे, मुलांनी मला नेहमीच सांगितले आहे की. सर, तुम्ही हे करा.  काय बरोबर  काय चुक हे मला कळत नाही आणि मला तु आवडते आणि तुझ्यावर प्रेम आहे असे कसे म्हणायचे हे देखील  माहित नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की सोना मॅडम "विल यु मॅरी मी"

व्हिडिओ पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. 

https://twitter.com/DuttShekhar/status/1766727853847232697

हे ऐकून सोना मॅडम काही सेकंदांसाठी अस्वस्थ झाल्या, मग तिने या प्रपोजलला  उत्तर दिले.  ती म्हणते, " खरं सांगायचं तर हा क्षण एवढ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, असं कधीच वाटलं नव्हतं.  मला हे नक्की आवडेल की माझे आई-वडील आणि  तुमचे आई-वडील या निर्णयात सहभागी व्हावे."

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या @DuttShekhar नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ वर नेटकऱ्यांकडून उलट सुलट गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.