दहावीचा निकाल 27 मे पर्यंत; शिक्षणमंत्री केसरकर यांनीच दिली माहिती  

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना 27 मे पर्यंत दहावीचा निकाल लागेल,असे सांगितल्याने विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

दहावीचा निकाल 27 मे पर्यंत; शिक्षणमंत्री केसरकर यांनीच दिली माहिती  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

SSC Board Result : राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल (10th Result) केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये (Students and parents)उत्सुकता आहे.मात्र,दहावीचा निकाल येत्या 27 मे पर्यंत जाहीर होऊ शकतो,असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar)यांनीच स्पष्ट केले आहे.त्यामुळे दहावीच्या निकालासाठी आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे.त्यानंतर लगेचच अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दूसरा भाग भरण्यास सुरूवात  होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केले होते. मात्र,कोणत्या तारखेस जाहीर होईल, याची माहिती दिली नव्हती.परंतु, केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना 27 मे पर्यंत दहावीचा निकाल लागेल,असे सांगितल्याने विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. निकालापूर्वी अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेण्यास सुरूवात केली जाते.त्यानुसार 24 मे पासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे,असेही केसरकर यांनी सांगितले.
---------------------