गोळवलकर गुरुजी शाळेची पोरं हुशार ; कैवल्य, प्राजक्ता, सृजाने मिळवले शंभर टक्के गुण

कैवल्य देशपांडे, प्राजक्ता नाईक, सृजा घाणेकर या सर्वांना शंभर टक्के गुण मिळाले असून शाळेतील ४७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.  

गोळवलकर गुरुजी शाळेची पोरं हुशार ; कैवल्य, प्राजक्ता, सृजाने मिळवले शंभर टक्के गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात 187 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवता चमकदार कामगिरी केली आहे.त्यात पुणे विभागातील 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.त्यातच पुण्यातील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा (Madhav Sadashiv Golwalkar Guruji Secondary School) शंभर टक्के निकाल (100% result) लागला आहे.त्यातही या शाळेतील कैवल्य देशपांडे, प्राजक्ता नाईक, सृजा घाणेकर या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दहावीचा निकाल (10th results 2024) कधी लागणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. अखेर सोमवारी  दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. कैवल्य देशपांडे, प्राजक्ता नाईक, सृजा घाणेकर या विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळाले असून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तन्वी कुलकर्णी ९९.२० टक्के आणि रमा गोखले हिने ९८.४० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. 

विशिष्ट दिव्यांगातून अंजनेय गाडगीळ या विद्यार्थ्याला ९१.४० टक्के तर निधी विपट हिला ६८.८० टक्के गुण मिळवले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन, मेहनत आणि परिश्रमाच्या बळावर शाळेला हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे शाळेतील ४७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.