धक्कादायक : अकरावी-बारावीच्या मुलांकडून चौथीपर्यंतच्या मुला-मुलींचे लैंगिक शोषण

लहान मुलांना धमकावणे, स्वच्छतागृहात बेसिनवर उभे राहून नाचायला सांगणे, अश्लील हावभाव कारणे, लैंगिक छळ करणे असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पालकांनी शाळेकडे केल्या होत्या.

धक्कादायक : अकरावी-बारावीच्या मुलांकडून चौथीपर्यंतच्या मुला-मुलींचे लैंगिक शोषण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Pune : पुण्यातील पर्वती (Parvati) परिसरातील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणा-या एका शाळेत अकरावी- बारावीच्या मुलांनी पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींचे लैगिंक शोषण (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी (Parents) व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNVS) कार्यकर्त्यांनी सोमवारी शाळेच्या आवारात आंदोलन करत दोषी विद्यार्थ्यांवरोधात पोलिसांकडे (Pune Police) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 

लहान मुलांना धमकावणे, स्वच्छतागृहात बेसिनवर उभे राहून नाचायला सांगणे, अश्लील हावभाव कारणे, लैंगिक छळ करणे असे प्रकार कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर करत असल्याच्या तक्रारी पालकांनी शाळेकडे केल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने याकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप करता पालकांनी शाळेत मोर्चा काढला. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत यावर शाळा प्रशासनाला जाब विचारला.

मोठी अपडेट : दहावी-बारावीच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याची गरज नाही!

 

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले, शाळेविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण अधिका-यांना याबाबत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल

.

मनविसेचे पर्वती विभाग अध्यक्ष संतोष वरे म्हणाले, शाळेतील अनेक मुलांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. मोठी मुले स्वच्छतागृहात जाऊन बसत. लहान मुले आली की त्यांचे लैंगिक शोषण करत होती. मुलांना धमकावत होती. स्वच्छतागृहात बेसिनवर उभे राहून नाचायला सांगत होती. तसेच  अश्लील हावभाव करत होती. याविरोधात पालक उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. मात्र, काही पालक समोर आल्यानंतर सर्वांनीच एकत्र येत शाळेला याबाबत जाब विचारला. सर्व विद्यार्थी १८ वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांची नावे उघड करता येत नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k