राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी न केल्यास विद्यापीठांवर कारवाई; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबईत विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या स्टिअरिंग कमिटीची दोन दिवसीय बैठक पार पडली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी न केल्यास विद्यापीठांवर कारवाई; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनाही (Universities in Maharashtra) चालू शैक्षणिक वर्षापासून धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण जी विद्यापीठे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीच 'एनईपी'ची अंमलबजावणी न करणाऱ्या विद्यापीठांवर कारवाईचे सुतोवाच केले आहे. मुंबईत विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या स्टिअरिंग कमिटीची दोन दिवसीय बैठक पार पडली. चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी बैठकीस उपस्थित होते.

स्वररंग २०२३ : वाडिया महाविद्यालय विजेते, पृथ्वीराज देशमुख ‘गोल्डन बॉय’ तर संध्या बेलके ‘गोल्डन गर्ल’

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचाकलक डॉ. विनोद मोहितकर, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचे प्राचार्य भरत अमळकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

या बैठकीबाबत पाटील यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी विद्यापीठांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बैठकीत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा केली. तसेच, जी विद्यापीठे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, असे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सध्या राज्यभरात नॅकचा मुद्दाही तापलेला आहे. नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याबाबतची पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आधीच महाविद्यालयांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या कारवाईला अनेक स्तरांतून विरोध होत असला तरी शासन मात्र त्यावर ठाम असल्याचे दिसते. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही विद्यापीठांवर मोठी जबाबदारी आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k