दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख का केला; शरद गोसावी यांनीच दिले स्पष्टीकरण

बोर्डाने उदात्त हेतूने हॉल तिकिटावर प्रवर्गाची नोंद केलेली आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी केलेले आहे. जर विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्गामध्ये, विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये चूक असेल तर तो सुध्दा बदल करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.

दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख का केला; शरद गोसावी यांनीच दिले स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी- मार्च 2025 (February-March 2025) मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी (10th-12th Exams) तयार केलेल्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा (Caste of student on hall ticket) नाही तर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हा उल्लेख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने व उदात्त हेतूने केलेला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरवर जातीच्या संवर्गाचा चूकीचा उल्लेख झाला तर तो पुन्हा बदलता येत नाही. वेळीच तो समजला तर विद्यार्थ्यांना दुरूस्ती करण्यासाठी ही संधी (opportunity for students) आहे. त्यामुळे कृपया पालक, विद्यार्थी, शिक्षक (Parents, students, teachers) यांनी याची कृपया नोंद घ्यावी. तसेच कोणताही गैरसमज पसरवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (State Board President Sharad Gosavi) यांनी केले आहे.

गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यांचा पेपर किती वाजता आहे आणि किती वाजता विद्यार्थ्याला परीक्षा द्यायला उपस्थित राहायचं आहे म्हणजे रिपोर्टिंग टाईम किती आहे, यांची माहिती हॉल तिकिटावर दिली आहे.त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग त्यामध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्यांना दहावीनंतर किंवा बारावीनंतर शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभाग, आदिवासी विभागाला आपल्याला प्रवर्गाची माहिती द्यावी लागते. त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा जुनिअर कॉलेजच्या जनरल रजिस्टरवर जर प्रवर्ग व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणे सहज शक्य होते. 

हॉल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख असल्यामुळे, विद्यार्थी किंवा पालकांना आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा जुनियर कॉलेजच्या जनरल रजिस्टरमध्ये जातीचा प्रवर्ग कोणता आहे हे कळू शकते, असे नमूद करून शरद गोसावी म्हणाले, आमच्याकडे अशी अनेक उदाहरण आहेत. ज्यात विद्यार्थ्यांना शाळा सोडल्यानंतर किंवा जुनिअर कॉलेज सोडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्ग चुकलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात. नियमानुसार, विद्यार्थ्यांना एकदा दहावी किंवा बारावी सोडली तर विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये, विद्यार्थ्यांच्या आडनावामध्ये, विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या नावांमध्ये, विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेमध्ये, विद्यार्थ्यांच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही त्यामुळे हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच विद्यार्थ्यांना आपल्या नावाचे स्पेलिंग बरोबर आहे का ? आपल्या आईचे बरोबर आहे का ? आपली जन्मतारीख बरोबर आहे का ? आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

बोर्डाने उदात्त हेतूने हॉल तिकिटावर प्रवर्गाची नोंद केलेली आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी केलेले आहे. जर विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्गामध्ये, विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये चूक असेल तर तो सुध्दा बदल करून घेण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवर्गामध्ये बदल असतील तर असा बदल करण्यासाठी विद्यार्थी शाळेत असताना किंवा जुनिअर कॉलेजमध्ये असतानाच तो बदल करता येतो. त्यासाठी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा विद्यार्थी शिक्षण उपसंचालक यांच्या परवानगीने तो बदल मुख्याध्यापकांना करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर हे कळले की आपल्या शाळेच्या जनरल राजिस्टरमध्ये मध्ये किंवा जुनियर कॉलेजच्या जनरल राजिस्टरमध्ये प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या पालकाच्या, फायद्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृपया पालक विद्यार्थी शिक्षक यांनी त्याची कृपया नोंद घ्यावी आणि कोणताही गैरसमज पसरवू नये,असेही आवाहन गोसावी यांनी केले आहे.