नॅक 'ए' ग्रेडमुळे टी. जे. महाविद्यालयाच्या लौकिकात भर : कृष्णकुमार गोयल 

महाविद्यालयाला 'ए' ग्रेड मिळाला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे,असे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. 

नॅक  'ए' ग्रेडमुळे टी. जे. महाविद्यालयाच्या लौकिकात भर : कृष्णकुमार गोयल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे (Tikaram Jagannath College)नॅक मूल्यांकन  30 व 31 ऑगस्ट रोजी पार पडले. या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅककडून जाहीर करण्यात आला असून महाविद्यालयाला 'ए' ग्रेड (Grade A from NAAC)मिळाला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे,असे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल (Krishna Kumar Goyal, President of Khadki Education Institute)यांनी सांगितले. 

नॅक मूल्यांकनाचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकाणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता , सचिव आनंद छाजेड,सहसचिव सुरजभान अगरवाल ,संचालक रमेश अवस्थी, भुतडा, पंगुडवाले, अजय सूर्यवंशी, मुरकुटे, काशिनाथ देवधर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गोयल म्हणाले,  मागील पाच वर्षात महाविद्यालयाने अभ्यास,  अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक राष्ट्रीय छात्र सेना, स्पर्धा परीक्षा, क्रीडा,  नेमबाजी या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली.

प्राचार्य संजय चाकणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले व सर्व क्षेत्रात विशेषता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या सुधारणा संस्थेने केल्याचे आवर्जून सांगितले.तसेच  महाविद्यालयाने केलेले संशोधन लिखाण,क्रीडा क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा घेतला. अजय सूर्यवंशी यांनी सर्वांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजेंद्र लेले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अर्जुन मुसमाडे यांनी व्यक्त केली