प्रा.किरणकुमार जोहरे यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील (Karmaveer Kakasaheb Wagh Mahavidyalaya)इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे (Prof. Kiran Kumar Johare)यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी प्रा किरणकुमार जोहरे "अंदाज नव्हे माहिती" या विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय हवामान अलर्ट व माहिती सेवेचा तसेच बांधावरील थेट योगदानाबद्दल तसेच शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल त्यांची एकमेव अशी निवड समितीतर्फे करण्यात आली आहे.
अमेरिकेसह जगातील १०० पेक्षा अधिक देशांनी दखल घेतली असे प्रा किरणकुमार जोहरे आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ म्हणून देखील ओळखले जातात. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आणि सकारात्मक विचाराने शेतकऱ्यांची व पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी व अखिल मानवजातीच्या भुकेची समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ब्लॉकचेन आदी एडव्हान्सड् इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर प्रा. किरणकुमार जोहरे संशोधनासाठी करत आहेत. त्यांच्या नावे २७ आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर्स व अनेक पेटंट, ट्रेडमार्क व कॉपीराइट आहेत. तंत्रज्ञान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये "किकु सर" या नावाने प्रसिद्ध आहेत. तंत्रज्ञान विषयावर विविध भाषेतील वृत्तपत्रात ते स्तंभलेखन करतात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, व निवड समितीचे अध्यक्ष व मुंबई हिन्दी विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू डॉ. बलदेव सिह चौव्हाण यांनी नुकतीच याची घोषणा जाहीर केली.
पुरस्कार निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, कार्यालयीन अधिक्षक आनंदा पवार, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा भगवान कडलग, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा मनिषा सोनवणे आदीसह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.