मराठीचा प्रमाण भाषा आणि बोली भाषा असा भेद करणे व्यर्थ

मराठीचा प्रमाण भाषा आणि बोली भाषा असा भेद करणे व्यर्थ आहे. मराठीतील बोली हे मराठीचे वैभव आहे.

मराठीचा प्रमाण भाषा आणि बोली भाषा असा भेद करणे व्यर्थ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एकमेकांशी संवाद साधणे हे भाषेचे मुख्य कार्य असते. मराठीचा प्रमाण भाषा आणि बोली भाषा असा भेद करणे व्यर्थ आहे. मराठीतील बोली हे मराठीचे वैभव आहे. सर्वसामान्य माणसांची संवाद साधण्यासाठी साधी सोपी भाषा म्हणून मराठीची ओळख आहे. मराठी भाषेवर अनेक भाषांचे अतिक्रमण झाले पण मराठी भाषा अशी अनेक अतिक्रमणे पचवून ती समृद्ध होत गेली. मराठीची वैश्विक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अट्टाहास होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल कार्यक्रम घेणारे महाराष्ट्रातील हे पहिले महाविद्यालयात आहे, असे गौरव उदगार महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe)यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल मराठी भाषेच्या गौरवार्थ 'माझी मराठी माझा अभिमान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चेतन तुपे पाटील बोलत होते.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, आयर्नमॅन डॉ. शंतनू जगदाळे ,महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. 

डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, मराठीला वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर मराठी भाषा ज्ञानभाषा  म्हणून मान्यता देऊन ती रोजगाराची भाषा बनली पाहिजे. तिला सर्जनात्मक आणि व्यवहारिक पातळीवर आपण मोठं करत राहण्याच्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी,  प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. लतेश निकम, प्रा. डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा.अनिल जगताप यांनी मानले.

-------------------
मराठी भाषेची विद्यापीठाची स्थापना व्हावीत. बालवाडी पासून उच्च पदवी पर्यंत चे शिक्षण हे मातृभाषेत मिळावे यासाठी शासनाकडे आग्रह आहे. न्यायालयाचे कामकाज व निकाल मराठीत मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दुकानाच्या पाट्या मराठीत लिहिण्याची कायद्यात दुरुस्तीचा ठराव करून कायदा करण्यात आला.

-  आमदार,चेतन तुपे