UGC-NET 2024 चे वेळापत्रक पुन्हा बदलले, आता 'या' तारखेला होणार परीक्षा

NTA एकाच दिवशी संपूर्ण भारतभर OMR मोडमध्ये UGC-NET आयोजित करेल.

UGC-NET 2024 चे वेळापत्रक पुन्हा बदलले, आता 'या' तारखेला होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  (NTA) उमेदवारांच्या विनंत्या आणि अभिप्राय मिळाल्यानंतर येत्या 16 जून रोजी होणारी विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट (UGC-NET 2024) परीक्षा येत्या 18 जून रोजी घेण्याचा निर्णय घेतला (Decided to take it on June 18) आहे. NTA एकाच दिवशी संपूर्ण भारतभर OMR मोड (OMR mode) मध्ये UGC-NET परीक्षा आयोजित करणार आहे. याबाबत NTA लवकरच औपचारिक अधिसूचना जारी (Issue of formal notification) करणार आहे. 

याबाबतची अधिकृत माहिती UGC चेअरमन एम.जगदीश कुमार यांनी आपल्या 'एक्स' या अकाउंट वर शेअर केली आहे. पुढील माहितीची NTA लवकरच औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. UPSC CSE परीक्षा 16 जून रोजी होणार आहे. हा वाद टाळावा यासाठी एनटीएने हा निर्णय घेतला आहे. 

जे उमेदवार चार वर्ष/ 8 सेमिस्टर बॅचलर डिग्री प्रोग्राम करत आहेत आणि त्यांच्या शेवटच्या सेमिस्टर/वर्षात आहेत ते देखील नेट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्रतेमध्ये चार वर्षांचा किंवा आठ-सेमिस्टरचा बॅचलर पदवी प्रोग्राम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.ज्यांना एकूण किमान 75 टक्के गुण किंवा बिंदू स्केलवर समतुल्य ग्रेड असणे आवश्यक आहे,जेथे ग्रेडिंग सिस्टमचे पालन केले जाते.