आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; एक लाखाहून अधिक अर्ज कन्फर्म करायचे राहिले 

आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आणखी आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याचेही अधिकारी सांगत आहेत.

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; एक लाखाहून अधिक अर्ज कन्फर्म करायचे राहिले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या आरटीई (Right to education-RTE) प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या 51 हजारांच्या आसपास दिसत असली तरी ऑनलाईन अर्ज भरलेल्या सुमारे एक लाख 38 हजार पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज अद्याप कन्फर्म केलेले नाहीत (Applications not yet confirmed),अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.तसेच आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास (fill RTE admission application)आणखी आठ ते दहा दिवसांची मुदतवाढ (extension of time)दिली जाणार असल्याचेही अधिकारी सांगत आहेत.त्यामुळे सध्या संथ प्रतिसाद असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने प्रतिसाद वाढणार का? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. 

आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प दिसत असली तरी काही पालकांनी भरून ठेवलेला अर्ज कन्फर्म केलेला नाही. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1 लाख 87 हजार पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला आहे .तर 1 लाख 38 हजार 724 पाल्यांचा अर्ज भरला असला तरी अद्याप तो अर्ज कन्फर्म केला नाही. पुणे जिल्ह्यात अर्ज कन्फर्म न झालेली संख्या 34 हजार 367 एवढी आहे.ठाण्यात ही संख्या 14 हजार 265 आहे.तसेच नागपूरमध्ये 9 हजार तर जळगावमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त आहे.त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल,अशी शिक्षण विभागाला अपेक्षा आहे. 

पालकांना त्यांच्या आवाडीच्या शाळा मिळत नसल्याने अद्याप त्यांनी अर्ज कन्फर्म केले नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सध्या कन्फर्म अर्जाची संख्या 51 हजारांच्या आसपास दिसत आहे. मात्र, पुढील काही दिवसात आरटीई प्रवेशाला कसा प्रतिसाद मिळेत, याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल. 

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीई प्रवेश अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपणार आहे.मात्र,पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी आठ ते दहा दिवस मुदतवाढ दिली जाणार आहे. 
---------------------------------------