UGC NET च्या अंतिम उत्तर की मधून अनेक प्रश्न 'ड्रॉप'
अनेक विषयांचे प्रश्न 'ड्रॉप' मध्ये टाकण्यात आले आहेत. ज्या विषयांचे प्रश्न बाद झाले आहेत, त्यात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, वाणिज्य, तत्त्वज्ञान आणि इतर अनेक विषयांचे प्रश्न आहेत. वगळलेल्या प्रश्नांसाठी सर्व उमेदवारांना गुण दिले जातील.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशभरातून सुमारे 9 लाख विद्यार्थी UGC NET ( University Grants Commission National Eligibility Test) परीक्षेच्या निकालाची (Exam Result) वाट पाहत आहेत. नुकतेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) NTA सुमारे 106 पृष्ठांमध्ये UGC NET अंतिम उत्तर की (Final answer key) 2024 प्रसिद्ध केली आहे. ही उत्तरपत्रिका NET च्या सर्व विषयांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी अनेक विषयांच्या अंतिम उत्तर की मधून अनेक प्रश्न वगळण्यात आले (Many questions were dropped) असून त्यांची यादी बरीच मोठी आहे.
UGC NET 2024 जून सत्राच्या 2024 च्या NET परीक्षेला बसलेल्या 9 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी अंतिम उत्तर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोगा UGC च्या अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.ac.in. वरून तपासू शकतात.
तथापि, अनेक विषयांचे प्रश्न 'ड्रॉप' मध्ये टाकण्यात आले आहेत. ज्या विषयांचे प्रश्न बाद झाले आहेत, त्यात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, वाणिज्य, तत्त्वज्ञान आणि इतर अनेक विषयांचे प्रश्न आहेत. अर्थशास्त्र विषयाचे चार प्रश्न, राज्यशास्त्राच्या पहिल्या शिफ्टमधून पाच प्रश्न, राज्यशास्त्राच्या दुसऱ्या शिफ्टमधून दोन प्रश्न, तत्त्वज्ञानाच्या 2 शिफ्टमधून एक प्रश्न, 1 शिफ्टमधून 1 प्रश्न, समाजशास्त्राच्या 2 शिफ्टमधून 6 प्रश्न. 'ड्रॉप' मध्ये टाकण्यात आले आहेत.
वगळलेल्या प्रश्नांसाठी सर्व उमेदवारांना गुण दिले जातील. UGC NET 2024 अंतिम उत्तर की दोन्ही परीक्षांच्या शिफ्ट्ससह NET च्या सर्व 83 विषयांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ड्रॉप प्रश्न सूचीमध्ये 'D' द्वारे सूचित केले आहेत.
दरम्यान, काही उमेदवारांनी काही पेपर्समधील 150 पैकी 30 प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचा दावा केला होता. मात्र, एजन्सीने याविषयी कसलेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.