नक्षलग्रस्तांसह बंदीजनांनी घेतले तुरुंगातून शिक्षण; १५२ कैद्यांनी मिळाली पदवी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनेक नक्षलग्रस्तांसह बंदीजनांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश टाकत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली देण्याचे काम केले आहे. शिक्षणाचे अमृत पाजून या बंदीजनांना सन्मानाचे आयुष्य बहाल करण्याचे काम मुक्त विद्यापीठ मागील काही वर्षांपासून करत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिकायच्या वयात कळत न कळत काही तरुण गुन्हेगारीकडे वळतात. मात्र, अशा तरुणांना तारण्याचे काम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) केले आहे. यातील काही गुन्हेगारांनी तुरूंगातून पदव्यांचे शिक्षण (152 prisoners pursued graduate studies) पूर्ण केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनेक नक्षलग्रस्तांसह बंदीजनांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश टाकत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली देण्याचे काम केले आहे. शिक्षणाचे अमृत पाजून या बंदीजनांना सन्मानाचे आयुष्य बहाल करण्याचे काम मुक्त विद्यापीठ मागील काही वर्षांपासून करत आहे. या संदर्भात मागील तीन वर्षाचा आढावा घेतला असता तब्बल १५२ बंदी असलेल्या कैद्यांनी या विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केल्याचे समोर आले आहे.
वंचितांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी ३६ वर्षापूर्वी (१ जुलै १९८९ रोजी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. या ३६ वर्षात लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. वंचितांपर्यंत शिक्षण जावे या भूमिकेतून नंतर या प्रवाहात बंदीजन आणि नक्षलवाद्यांचाही समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बी. ए. व एम. ए. मराठी, योग शिक्षक (पदविका) आणि बी. कॉम. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.
कैद्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट
जे कैदी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतात. त्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट देण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढला आहे. या बंदीजनांपैकीच काहींनी पुढील शिक्षण घेत मोठ्या पदावर काम सुरू केले आहे. तर काही बंदीजनांनी कायद्याची पदवी घेत आहेत. मागील तीन वर्षाचा आढावा घेतला तर २०२२-२३ या वर्षी ४८ कैद्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे तर २०२३-२४ या वर्षात हा आकडे ७१ वर गेला. मात्र, २०२४-२५ या वर्षात पुन्हा ही संख्या खाली येवून ३३ विद्यार्थी पदवी परीक्षेचे शिक्षण घेत आहेत. मागील तीन वर्षात १५२ कैद्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे.
eduvarta@gmail.com