महापालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांची रा‍त्रीपासून तोबा गर्दी

आजही काही शाळा अशा आहेत की, जिथे पालक आवर्जून मुलांना त्याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरातील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर ही महापालिकेची सरकारी शाळा आहे. जिथे पालकांनी मुलांना प्रवेश मिळावा यासाठी रात्रीपासूनच शाळेबाहेर तोबा गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

महापालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांची रा‍त्रीपासून तोबा गर्दी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर येथील एका सरकारी शाळेत (Kolhapur Government School) प्रवेश घेण्यासाठी पालकांनी रात्रीपासूनच तोबा गर्दी (Parents crowd outside the school since night) केल्याचे समोर आले आहे. हल्ली सरकारी शाळा म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. मात्र आजही काही शाळा अशा आहेत की, जिथे पालक आवर्जून मुलांना त्याच शाळेत प्रवेश मिळावा (Trying to get a child into school) म्हणून धडपडत आहेत.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरातील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर (Smt. Laxmibai Jarg Vidya Mandir) ही महापालिकेची सरकारी शाळा आहे. जिथे पालकांनी मुलांना प्रवेश मिळावा,यासाठी रात्रीपासूनच शाळेबाहेर तोबा गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

कोल्हापूरातील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर शाळेची जिल्ह्यातच नाही तर राज्यभर ख्याती आहे. विशेष म्हणजे ही महापालिकेची सरकारी शाळा आहे. इयत्ता पहिल्याच्या वर्गासाठी या शाळेची प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केली जाते. एकीकडे खाजगी इंग्रजी शाळेचं पेव फुटले असताना दुसरीकडं महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड का असते? याच कारण शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती आहे. या शाळेतील अनेक मुले राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रक्रमाने येतात. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक सुरुवातीपासून प्रयत्न करत असतात. महापालिकेची शाळा असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी शाळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी खर्च आणि दर्जेदार शिक्षण यामुळेच पालकांचा कल या महापालिका शाळेकडे वळल्याचे दिसून येत आहे. 

दरवर्षी या शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी इयत्ता 1 लीची प्रवेश प्रक्रिया असते. यंदाही ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रवेशासाठी पालकांनी मोठी गर्दी केली. पालकांच्या या गर्दीमुळे एका बाजूला खासगी शाळांमुळे शासकीय, महापालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे दृश्य असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोल्हापूरच्या महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी चक्क पालकांनी शाळेसमोर रांगा लावल्याच पाहायला मिळाले. खासगी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आपण नेहमीच पाहतो, पण महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी होणारी कदाचित राज्यातील ही पहिलीच शाळा असेल.