पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे बिगूल वाजले, मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर..  

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आत्तापासूनच तयारीला लागले आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला पब्लिक नोटीस काढण्यात येणार आहे. तर १५ ऑक्टोबरला वृत्तपत्रात अधिकृत प्रकाशित केले जाणार आहे. तसेच आक्षेप नोंदवण्यासाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा कालावधी देण्यात येणार आहे. यासाठीची मतदार यादी अधिकृतपणे ३० डिसेंबर रोजी प्रकाशित जाईल. 

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे बिगूल वाजले, मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर..  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील  पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या पदवीधर तर पुणे आणि  अमरावती या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकींना (Teachers, Graduates Constituency Election) आणखी वर्षभराचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) वरील सर्व मतदार संघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर (Voter registration program announced) करून जणू काय निवडणूकीचा बिलगूच वाजवला आहे. सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच निवडणुका चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या होताना दिसत आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीपासून ते निकालापर्यंत सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागलेले असते.

प्रत्यक्ष निवडणुकीस वर्ष बाकी असले तरी मतदार नोंदणी मात्र सुरू होणार. तसा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २०२६ मध्ये रिक्त होणार्‍या पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर पदवीधर तसेच पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुका होणार. सध्या अनुक्रमे या मतदारसंघात अरुण लाड, सतीश चव्हाण, अभिजित वंजारी व शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर व किरण सरनाईक हे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

मात्र, या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आत्तापासूनच तयारीला लागले आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला पब्लिक नोटीस काढण्यात येणार आहे. तर १५ ऑक्टोबरला वृत्तपत्रात अधिकृत प्रकाशित केले जाणार आहे. तसेच आक्षेप नोंदवण्यासाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा कालावधी देण्यात येणार आहे. यासाठीची मतदार यादी अधिकृतपणे ३० डिसेंबर रोजी प्रकाशित जाईल. 

नागपूरातून शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी हे आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या माजी महापौर संदीप जोशी यांचा पराभव करून ते निवडून आले होते. मावळते आमदार अनिल सोले यांची तिकीट कापून जोशी यांना तिकीट देण्यात आल्याने भाजप वर्तुळत चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे काँग्रेस व मित्र पक्षांनी या निवडणुकीत एकी दाखवीत वंजारी यांना निवडून आणले होते. मात्र, आपल्या निकटवर्ती जोशी यांचा पराभव झाल्याची सल फडणवीस यांच्या मनात कायम राहिली. तर इकडे पुण्यात शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.