अभियांत्रिकी प्रवेशाचा विक्रम, १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित.. 

यंदा इंजिनिअरिंगसाठी तब्बल २ लाख २५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात चार कॅप फेऱ्यांमध्ये १ लाख ३० हजार ८३५ विद्यार्थ्यांनी, तर संस्थात्मक स्तरावर २३ हजार ४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच व्यवस्थापन कोट्यातून १२ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २ लाख २ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ६६ हजार ७४६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

अभियांत्रिकी प्रवेशाचा विक्रम, १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाने (Engineering courses) प्रवेशाचा नवा विक्रम (New record of admission) केला आहे. या अभ्यासक्रमासाठी तब्बल १ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांनी आपले  प्रवेश निश्चित (Admission of 1 lakh 68 thousand students confirmed) केले आहेत. हे आत्तापर्यतच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठीचे सर्वाधिक प्रवेश आहेत. यात सर्वाधिक प्रवेश कॉम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांना झाले असून कॉम्प्युटर, आयटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तीन अभ्यासक्रमाच्या (Computer, IT and Artificial Intelligence Courses) एकत्रित १ लाख ५ हजार जागांपैकी ९२ हजार ३७२ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेशाचे हे प्रमाण जवळपास ८८ टक्के एवढे आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. 

यंदा इंजिनिअरिंगसाठी तब्बल २ लाख २५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात चार कॅप फेऱ्यांमध्ये १ लाख ३० हजार ८३५ विद्यार्थ्यांनी, तर संस्थात्मक स्तरावर २३ हजार ४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच व्यवस्थापन कोट्यातून १२ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २ लाख २ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ६६ हजार ७४६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

सर्वाधिक प्रवेश कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आयटी, एआय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी झाले असून नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस असल्याचे चित्र होते. यंदा जवळपास ८२ टक्के जागा भरल्याने कॉलेजांनाही दिलासा मिळाला आहे. यंदा मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले आहे.

राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी ६२ हजार १९५ मुलींनी प्रवेश घेतला आहे. तर १ लाख ४ हजार ५५० मुलांनी प्रवेश घेतला. मुलांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३७.३० टक्के आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी ५२ हजार ७५१ मुलींनी, तर ९६ हजार ३२६ मुलांनी प्रवेश घेतला होता. गेल्यावर्षी मुलींचे प्रमाण ३५.३८ टक्के होते.