NMMS परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; काय आहेत अटी, नियम...

शिक्षणात प्रगती करणाऱ्या, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. 

NMMS परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; काय आहेत अटी, नियम...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारी एनएमएमएस परीक्षा (NMMS Exam) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या वतीने घेतली जाणारी ही परीक्षा, आठवीत शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजारची शिष्यवृत्ती (Scholarship of Rs 12,000 every year) मिळवून देते. परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू (The application process for the exam has begun) झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

एनएमएमएस परीक्षा -

शिक्षणात प्रगती करणाऱ्या, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. 

आर्थिक लाभ -

या शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १,००० याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. नववीमध्ये प्रवेश घेतल्यावर ही शिष्यवृत्ती सुरू होते आणि विद्यार्थी दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये नियमितपणे उत्तीर्ण झाल्यास, पुढील तीन वर्षांसाठी ती सुरू राहते. यासाठी विद्यार्थ्याने दहावीत ६० टक्के आणि अकरावीत ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

ही परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये आणि खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते, परंतु ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतात.

इथे करता येणार अर्ज -

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mscepune.in) जाऊन अर्ज करायचा आहे. नियमित शुल्कासह १२ सप्टेंबर 3 ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर विलंब शुल्कासह १२ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता -

महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत, किंवा खासगी अनुदानित शाळेत इयत्ता ८ वीमध्ये विद्यार्थी शिकत असावा, पालकांचे वार्षिक उत्पन्न ३.५ लाखांपेक्ष कमी असावे. विद्यार्थ्याने ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण (एससी/एसटीसाठी ५० टक्के) मिळवलेले असावेत.