शिक्षकाला विद्यार्थ्यीनीने शिकवला धडा; छेड काढल्याने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विद्यार्थिनीच्या विनयभंगाची बातमी शाळेत पसरताच आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आपल्या चुकीबद्दल माफी मागितली.

शिक्षकाला विद्यार्थ्यीनीने शिकवला धडा;  छेड काढल्याने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक हा गुरु असतो. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे, संस्काराने धडे मिळत असतात. पण जेव्हा शिक्षकालाच धडे देण्याची वेळ येते तेव्हा, अशा लोकांबद्दल चिड निर्माण होते आणि पालकांच्या मनात भितीचे वातावरण तयार होवू लागते. आज काल शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेड (Teacher molests students) काढणे, विनयभंग करणे, अत्याचार (Crime News) यांसारख्या घटना वारंवार घडताना दिसत आहे. अशाच एका घडनेची बळी ठरलेल्या एका विद्यार्थिनीने छेडछाड (Student Harassment) करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यानंतर चोप देवून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

राजस्थान येथील कैलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी शाळेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच स्थानिक पंच पटेलांनी तालिबानी शैलीत शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाला प्रार्थना सभेत शेकडो विद्यार्थी आणि गावकऱ्यांसमोर स्टेजवर उभे करून शिक्षा करण्यात आली.

प्रत्यक्षात विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी व गावातील पंच पटेलांनी विद्यार्थिनी  व शिक्षकाला प्रार्थना सभेला उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंचावर बोलावले. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे शिक्षकाने विद्यार्थिनीच्या पायाला हात लावताच विद्यार्थिनीने शिक्षकाच्या कानाखाली लगावली. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. 

प्रॅक्टिकलच्या वेळी क्रीडा कक्षाजवळ शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या विनयभंगाची बातमी शाळेत पसरताच आरोपी शिक्षक विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. यादरम्यान शिक्षकाला विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी चांगलाच चोप दिला.