धक्कादायक ! परीक्षा विभागाचे उत्पन्न निम्म्याने घटले; काय आहे खरे कारण ?

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाशी संलग्न असणारी अनेक नामांकित व मोठी महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.

धक्कादायक ! परीक्षा विभागाचे उत्पन्न निम्म्याने घटले;  काय आहे खरे कारण ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) उत्तपन्नात दिवसेंदिवस घट होत चालली असून त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात विद्यापीठाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणाऱ्या परीक्षा विभागाचे उत्पन्न (Income of Examination Department) गेल्या काही वर्षांचा विचार करता निम्म्याने घटले (reduced by half)आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळासाठी हा मोठा चिंतेचा विषय ठरत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy)अंमलाबाजवणीच्या पार्श्वभूमीवर उत्त्पन्न वाढीसाठी नवीन सोर्स निर्माण करण्याचे विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची आणि शैक्षणिक संस्थांची संख्या सुमारे एक हजाराच्या घरात आहे.विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सुमारे साडेसात लाख एवढी आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाशी संलग्न असणारी अनेक नामांकित व मोठी महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.त्याचप्रमाणे नव्याने निर्माण होणारी सर्व व्यावसायिक महाविद्यालये ही लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होत आहेत.पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क अधिक आहे.मात्र, उत्त्पन्न देणारी महाविद्यालये आता पुणे विद्यापीठाशी संलग्न होत नाहीत.उलट त्यांची संख्या कमी होत चालली आहेत.

विद्यापीठाशी संलग्न असणारी पुणे,अहमदनगर व नाशिक जिलह्यातील सुमारे 50 महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.त्यात बहुतांश महाविद्यालये ही सुमारे पाच ते दहा हजारांहून अधिक विद्यार्थी संख्या असणारी आहेत.या महाविद्यालयांकडून विद्यापीठाला मिळणारे परीक्षा शुल्क कमी झाले आहे.पाच ते सात वर्षांपूर्वी एकटा परीक्षा विभाग विद्यापीठाला तब्बल 300 कोटी रुपये उत्पन्न मिळवून देत होता.मात्र, आता हे उत्त्पन्न 160 कोटीपर्यंत कमी झाले असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे परीक्षा विभागाचे उत्पन्न निम्म्याने घटले असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना काळात विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात घट  करण्यात आली होती.तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जात आहे.त्यातच परीक्षांचे निकाल लवकर लावण्यासाठी कॅप सेंटरची संख्या वाढवावी लागली.त्यामुळे खर्चातही काही प्रमाणात वाढ झाली.परिणामी विद्यापीठाच्या उत्त्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे.मात्र, ही बाब निश्चितच चिंता वाढवणारी आहे.
-------------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उत्त्पन्न काही वर्षांपूर्वी सुमारे 300 कोटींच्या घरात होते.परंतु, स्वायत्त महाविद्यालयांची वाढती संख्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होणारी महाविद्यालये या कारणांमुळे त्यात घाट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

- डॉ.अशोक चव्हाण, माजी परीक्षा नियंत्रक , संवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ