धक्कादायक : MPSC ची गोपनीय माहिती लिक; प्रश्नपत्रिकेसह लाखभर प्रवेशपत्रही हॅक?

आयोगाची गोपनीय माहितीच लिक केल्याचा दावा एका हॅकरने केल्याने खळबळ उडाली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

धक्कादायक : MPSC ची गोपनीय माहिती लिक; प्रश्नपत्रिकेसह लाखभर प्रवेशपत्रही हॅक?
MPSC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) येत्या ३० एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसह तब्बल ९० हजारांहून अधिक प्रवेशपत्र (Hall Ticket) हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आयोगाची गोपनीय माहितीच लिक केल्याचा दावा एका हॅकरने केल्याने खळबळ उडाली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. (The hacker claims to have leaked the admit card and question paper of the MPSC exam)

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या तब्बल ९० हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र टेलीग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. आयोगातर्फे डीवायएसपी सारख्या महत्त्वाच्या पदांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. मात्र, ऑनलाइन यंत्रणा सक्षम नसेल तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बळीराम डोळे यांनी केली आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती समजतात. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बळीराम डोळे म्हणाले, येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेत सुमारे ४ लाख ६५ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तत्पूर्वीच आयोगाकडे असणारी गोपनीय माहिती लिक झाल्याचा दावा केला जात आहे.

हॅकरने आपल्याकडे केवळ हॉल तिकीटच नाही तर प्रश्नपत्रिका असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे आयोगाने या सर्व प्रकरणाची सफल चौकशी करावी तसेच पेपर लीक होण्याची शक्यता असल्यास दुसऱ्या प्रश्नपत्रिका तयार करून ठेवाव्यात. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.