मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी नाही, राजेंनी सुरू केली; उदयनराजेंच्या वक्तव्याने वाद पेटला..
मुलींची पहिली शाळा (First school for girls) महात्मा फुलेंनी (Mahatma Phule) नाही, तर प्रतापसिंह महाराज (Pratap Singh Maharaj) यांनी सुरू केली असे वक्तव्य छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आणि मराठा असा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुलींची पहिली शाळा (First school for girls) महात्मा फुलेंनी (Mahatma Phule) नाही, तर प्रतापसिंह महाराज (Pratap Singh Maharaj) यांनी सुरू केली असे वक्तव्य छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आणि मराठा असा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं” खासदार उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले वाड्यात हे वक्तव्य केलं.
स्त्रियांची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली या उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी समाचार घेतला. “उदयन राजे यांचे वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं. महात्मा फुलेंच महत्व कळल्याने उदयन राजे हे फुले वाड्यावर आलेत अस वाटलं. इथं येऊन जयंतीच्या दिवशी, फुलेंच महत्व कमी करायचं. त्यांच्या पूर्वजांच महत्व वाढवलय” असं मंगेश ससाणे म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला” असं मंगेश संसाणे म्हणाले.
“महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयन राजे यांचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे. आत्तापर्यंतचे संशोधक, इतिहास तज्ञ फेल ठरलेत. उदयन राजे यांनी जे वक्तव्य केलय. प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली. शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं काय झालं? परत शाळा का सुरू राहिली नाही?” असं प्रश्न मंगेश संसाणे यांनी विचारले आहेत.
__________________________
अशा प्रकारे इतिहासाची छेडछाड केली जाणे हे दुर्दैवी आहे. दलित आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा फुलेंनी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली आहे, असा असताना हे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे.
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष