धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या 

शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गातून बाहेर पडल्यानंतर शिक्षकाने गळफास घेतला. शाळा भरल्यानंतर मुले परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत शिक्षक आपली पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगीसह पाचोरा येथील दहीगाव संत येथे वास्तव्यास होते.

धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा येथील एक शिक्षकाने शाळेच्या वर्गातच आत्महत्या (Teacher's suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पाचोरा येथील सुपडू भादू पाटील शाळेत 25 जून रोजी सकाळी घडली. रवींद्र भरत महाले (Ravindra Bharat Mahale) (वय, ४२) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 

शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गातून बाहेर पडल्यानंतर शिक्षकाने गळफास घेतला. शाळा भरल्यानंतर मुले परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत शिक्षक आपली पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगीसह पाचोरा येथील दहीगाव संत येथे वास्तव्यास होते. मात्र, आज शाळेच्या मधल्या सुट्टी दरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत असताना रवींद्र महाले यांनी वर्गात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर शिक्षकांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यावर सायंकाळी अंत संस्कार करण्यात येणार आहेत. महाले यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. परंतु, मानसिक तणावातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.