एमपीएससी भरती प्रक्रियेत आता पर्सेंटाईल पद्धत लागू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये ग्रुप क पदांचा समावेश असतो. आयोगाने त्याच्या परिपत्रकांनुसार यापुढे स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरिता किमान पर्संटाईल अर्हतामान लागू करण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षेच्या गुणांकनावर काय परिणाम होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. आयोगाने स्पर्धा परीक्षा प्रमाणेच इतर सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी (Saral Service Recruitment Process) आता गुणांकणाची कुठली प्रक्रिया लागू होणार यासंदर्भात परिपत्रक जाहीर (Circular issued) केले आहे. आयोगाच्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार पर्संटाईल पद्धत लागू (Percentile method applied) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये ग्रुप क पदांचा समावेश असतो. आयोगाने त्याच्या परिपत्रकांनुसार यापुढे स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरिता किमान पर्संटाईल अर्हतामान लागू करण्यात आला आहे.
पर्सेटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची संख्या जी दर्शवते की विशिष्ट डेटा पॉइंटच्या किती टक्के मूल्ये खाली आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराची टक्केवारी ९० असेल, तर त्याचा अर्थ असा की त्याने किंवा तिने इतर ९०% उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली. एमपीएससी परीक्षेत, प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्संटाइलचा वापर केला जातो, विशेषतः जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते. त्यामुळे पर्सेंटाईल पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com