पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळांमध्ये 327 जागांवर शिक्षक भरती ; 1 एप्रिलपासून अर्ज करता येणार

उमेदवार पिंपरीगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज सादर करू शकतात. सर्व रिक्त पदे ही आरक्षण निहाय भरली जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळांमध्ये 327 जागांवर शिक्षक भरती ; 1 एप्रिलपासून अर्ज करता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातर्फे (Pimpri Chinchwad Municipal Corporation Primary Education Department)शैक्षणिक वर्ष 2024 -2025 या कालावधीसाठी मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या (Marathi, Urdu, Hindi medium)शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. पालिका प्रशासनातर्फे एकूण 327 जागांसाठी शिक्षक भरती (Teacher Recruitment)केली जाणार असून उमेदवारांकडून येत्या 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2012 कालावधी सक्षम अर्ज मागविण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मराठी माध्यमाच्या एकूण 245 जागा असून त्यात सहाय्यक शिक्षकाच्या 151 तर पदवीधर शिक्षकाच्या 94 जागा आहेत. उर्दू माध्यमाची एकूण 66 पदे असून त्यात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षकाची प्रत्येकी 33 पदे आहेत. तर हिंदी माध्यमाच्या एकूण 16 जागा साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार पिंपरीगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज सादर करू शकतात. सर्व रिक्त पदे ही आरक्षण निहाय भरली जाणार आहेत. भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनातर्फे तात्पूरत्या मानधनावर हंगामी स्वरूपाची शिक्षकांची निवड केली जात आहे. या उमेदवारांना मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही.तसेच हे पण शैक्षणिक वर्ष 2024 25 या कालावधी करतात राहील. त्याचप्रमाणे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे असतील,असेही जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.