CBSE बोर्डाकडून दहावी,बारावी अभ्यासक्रम जाहीर; 1 एप्रिलपासून सत्र सुरू

दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असतील. यासोबतच 2 ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तर बारावीसाठी ७ विषय अनिवार्य करण्यात आले आहेत.

CBSE बोर्डाकडून दहावी,बारावी अभ्यासक्रम जाहीर; 1 एप्रिलपासून सत्र सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

CBSE बोर्डाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्या असून बारावी बोर्डाच्या परीक्षा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने  शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम जाहीर (Class 10th 12th Syllabus announced) केला आहे. नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल.

CBSE बोर्डाने आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाचे वर्गीकरण माध्यमिक अभ्यासक्रम आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमात असे केले आहे. माध्यमिक अभ्यासक्रम इयत्ता 9 व 10 साठी आहेत. तर इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे.दरम्यान सीबीएसई ने यावेळी  इयत्ता 3 आणि 6 च्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच नवीन पुस्तकेही लाँच केली जाणार आहेत. 

इयत्ता दहावी आणि बारावीसाठी अभ्यासक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असतील. यासोबतच 2 ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तर बारावीसाठी ७ विषय अनिवार्य करण्यात आले आहेत. या यादीमध्ये मानविकी, गणित, भाषा, विज्ञान, सामान्य अध्ययन, कौशल्य विषय आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यांचा समावेश आहे. 

असा तपासू शकाल नवीन अभ्यासक्रम 

* सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.cbse.gov.in/ वर जा.
* आता Academic Website च्या पर्यायावर क्लिक करा.
* सत्र 2024-25 अभ्यासक्रमाची लिंक मुख्यपृष्ठावरील शैक्षणिक विभागात दिसून येईल. त्यावर क्लिक करा.
* स्क्रीनवर एक नवीन PDF उघडेल, ती काळजीपूर्वक वाचा आणि डाउनलोड करा.