बावनकुळेंच्या आदेशानंतर पारधी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार जात प्रमाणपत्र

पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अनेक हेलपाटे घालूनही जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते. दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली. शेवटी या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

बावनकुळेंच्या आदेशानंतर पारधी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार जात प्रमाणपत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पारधी समाजातील विद्यार्थ्यांना (Students from the Pardhi community) अनेक हेलपाटे घालूनही जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते. दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली. शेवटी या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर जात प्रमाणपत्रासाठी प्रलंबित असलेले सर्व अर्ज मंजूर करण्यात आले असून लवकरच संबंधितांना जात प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत. 

जात प्रमाणपत्रासाठी महसूल प्रशासनाकडून प्रत्येकासाठी १९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे. मात्र, पारधी समाजातील यापूर्वीच्या पिल्या जंगल खोऱ्यात भटकंतीचे जीवन जगत असल्यामुळे अनेक पारधी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या आधीच्या पिढीचे (पूर्वजांचे) जातीचे दाखले व इतर पुरावे नाहीत. त्यामुळे अनेक होतकरू पारधी विद्यार्थ्यांना आदिवासी म्हणून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करून दोन-दोन वर्ष उलटले, तरी त्यांना नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने जात प्रमाणपत्र दिलेले नाही. अर्ज केल्यानंतर दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते, यासाठी जबाबदार कोण, संबंधितांवर कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पारधी समाजाची १९५० पूर्वीच्या पुराव्याची अडचण राज्य सरकारने यापुर्वीच लक्षात घेतली होती. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना पारधी  बेड्यांवर जाऊन गृहभेटी आणि चौकशी करून १९५० पूर्वीचे पुरावे नसलेल्या पारधी जातीतील अर्जदारांना जात प्रमाणपत्र द्यावे असे नियम तयार केले आहेत. मात्र महसूल प्रशासनाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेकडो पारधी विद्यार्थी जात प्रमाणपत्र विना  वंचित राहात असल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत होते . मात्र, आता या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.