अभ्यासक्रम आराखडा : सुचनांसाठीचा कालावधी तोकडा, ३० दिवसांची मुदत देण्याची मागणी

राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिध्द केल्यानंतर त्यावर २० ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. परिषदेने दिलेल्या लिंकवर प्राधान्याने प्रतिसाद नोंदवावेत असे नमूद करण्यात आले आहे.

अभ्यासक्रम आराखडा : सुचनांसाठीचा कालावधी तोकडा, ३० दिवसांची मुदत देण्याची मागणी
State Curriculum Framework

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखड्याचा (State Curriculum Framework 2023) मसुदा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यावर विविध घटकांकडून अभिप्राय मागविण्यात आले असले तरी त्यासाठी देण्यात आलेला कालावधी अत्यंत तोकडा आहे. त्यामुळे अभिप्राय देण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदत देण्याची मागणी शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक (Kishor Darak) यांनी केली आहे.

 राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिध्द केल्यानंतर त्यावर २० ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. परिषदेने दिलेल्या लिंकवर प्राधान्याने प्रतिसाद नोंदवावेत असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मेलद्वारे किंवा पोस्टानेही पाठविता येणार आहेत. पण परिषदेने त्यासाठी दिलेल्या केवळ आठ दिवसांच्या कालावधीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. अभिप्रायासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत.

शैक्षणिक आराखड्यात असे आहे पूर्व प्राथमिक अन् पहिली-दुसरीचे वेळापत्रक...

 याबाबत किशोर दरक यांनी परिषदेच्या संचालकांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. मी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षणासंबंधीची धोरणे हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे. MSCERT ने २० ऑक्टोबर रोजी 'राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर' (मसुदा) प्रकाशित केला आहे. हा मसुदा प्रसिद्ध करताना लोकांचे प्रतिसाद मागवणे, ही लोकशाही प्रक्रियेला दृढ करणारी, स्वागतार्ह बाब आहे. मात्र यासाठी देण्यात आलेली केवळ एका आठवड्याची मुदत अत्यंत अपुरी आहे, असे दरक यांनी म्हटले आहे.  

 आराखडा ३४० पेक्षा अधिक पानांचा हा व्यामिश्र दस्तऐवज अर्थपूर्ण रितीने वाचून प्रतिसाद नोंदवायचा असेल, तर केवळ सात दिवस हा  कालावधी फार तोकडा आहे. त्यामुळे प्रतिसाद देण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदत द्यावी. या संदर्भातील माहिती राज्यभरातील सामन्य जनतेला, अभ्यासकांना, तज्ज्ञांना व्हावी, म्हणून वर्तमानपत्रांमधून पुरेशी प्रसिद्दी द्यावी. केवळ समाजमाध्यमांमधून दिली जाणारी प्रसिद्धी प्रतिसाददात्यांच्या संख्येवर मोठी मर्यादा आणू शकते, अशी विनंती दरक यांनी केली आहे.

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k