विद्यापीठाने सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना दिली दोन परीक्षांची संधी

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील सुमारे सात हजार  विद्यार्थ्यांना आता अधिकच्या दोन परीक्षा देता येणार आहेत. विद्यापीठाच्या विद्या परिषदेत बुधवारी या निर्णयावर शिक्का मोर्तब झाले.

विद्यापीठाने सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना दिली दोन परीक्षांची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune university) पाच वर्षांच्या आत पदवी अभ्यासक्रम पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना (fail student) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील (University affiliated colleges) सुमारे सात हजार  विद्यार्थ्यांना आता अधिकच्या दोन परीक्षा देता येणार आहेत. विद्यापीठाच्या विद्या परिषदेत (academic Council) बुधवारी या निर्णयावर शिक्का मोर्तब झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.या वृत्तास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दुजोरा दिला आहे. 

हेही वाचा : पुण्यातील कोचिंग क्लासेसवर कारवाई होणार का? दिशाभूल करण्यासाठी चढाओढ

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून पाच वर्षांच्या आत आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विधी अभियांत्रिकी विज्ञान अशा विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या ६ ते ७  हजार विद्यार्थ्यांचा पाच वर्षाहून अधिक कालावधी उलटून गेल्यामुळे शैक्षणिक  प्रश्न निर्माण झाला होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांचा पी.आर.एन. ब्लॉक केला होता. परिणामी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन आंदोलन केले होते. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळात (बीओई) चर्चा करण्यात आली होती. तसेच परीक्षा मंडळांनी त्यावर सकारात्मक निर्णय दिला होता.

विद्यापीठाच्या बुधवारी घेण्यात आलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत (अकॅडमीक काउन्सिल) 'एन प्लस टू' या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार पाच वर्षांमध्ये पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आणखी दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 -----------------
" पाच वर्षांच्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण न करू शकलेल्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी देण्याचा निर्णय बीओईमध्ये घेण्यात आला होता. त्यास बुधवारी विद्या परिषदेमध्ये मान्यता देण्यात आली. त्यामुळे बुधवारपासूनच संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. " 

- डॉ.महेश काकडे, संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे