आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  22 जानेवारी रोजीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार 

विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हिवाळी सत्र करीता फेज-3 साठी जाहिर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.

आरोग्य विज्ञान  विद्यापीठाच्या  22 जानेवारी रोजीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा (Shri Ram Lalla Prana Pratishtha) दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली असली तरी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान (Maharashtra Health Sciences) विद्यापीठाची विविध विद्याखांची फेज - 3 मधील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा (Written and Practical Examination) विद्यापीठाने जाहिर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्री रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त  शासनाने सुट्टी जाहिर केली असली तरी विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हिवाळी सत्र करीता फेज-3 साठी जाहिर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; विद्यापीठाचे पेपर स्थगित

या परीक्षेकरीता प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सूचनेची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यायातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे डॉ संदीप कडू यांनी सांगितले  आहे.