भारतीय शास्त्रज्ञांची अभिमानास्पद कामगिरी; कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध

कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पल्सार ताऱ्यांचे निरीक्षण केले. या निरीक्षणासाठी नारायणगाव जवळील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपने वापर करण्यात आला.

भारतीय शास्त्रज्ञांची अभिमानास्पद कामगिरी; कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध
Low frequency Gravitational Waves

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही दशकांपासून भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांकडून सुरू असलेल्या संशोधनातून (Research) महत्वाचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांना कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या (Low frequency Gravitational Waves) अस्तित्वाचा पहिला पुरावा मिळाला आहे. यामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांची (Indian Astronomer) भूमिकाही महत्वाची राहिली आहे. नारायणगाव जवळील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (GMRT) माध्यातून नोंदविलेल्या निरीक्षणांचा या शोधात महत्वाचा वाटा आहे.

पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी गुरूवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत या शोधाबाबत माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांनी गुरुवारी पहाटेच याबाबतची घोषणा केली आहे. या शोधाच्या अनुषंगाने एकाच दिवशी १६ शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये ‘एनसीआरए’सह युरोप आणि जपानच्या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग होता.

स्टार्ट अप्समध्ये राज्याचा डंका; देशांतील नऊ राज्यांमधील १२ विजेत्यांपैकी चार महाराष्ट्रातील

कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पल्सार ताऱ्यांचे निरीक्षण केले. या निरीक्षणासाठी नारायणगाव जवळील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) वापर करण्यात आला. तब्बल २५ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. जगभरातील सहा रेडिओ दुर्बिणींच्या सहाय्याने एकत्रित केलेल्या विश्लेषणाच्या आधारे सुक्ष्म गुरुत्वीय लहरींची अस्तित्व सिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये लायगो आणि व्हर्गो या प्रयोगशाळांनी गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व शोधले होते. आता युरोपीयन आणि इंडियन पल्सार टायमिंग अरे या समुहातील शास्त्रज्ञांनी सूक्ष्म वारंवारितेचा लहरींचा शोध लावला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना एनसीआरएचे संचालक यशवंत गुप्ता म्हणाले, ‘सर्व प्रकारच्या लहरींमध्ये गुरूत्वीय लहरी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पल्सार टायमींग अरे संबंधी संशोधन हे त्याचाच एक भाग आहे. कमी वारंवारितेच्या रेडिओ लहरींचे निरीक्षण नोंदविण्यात जीएमआरटीचा महत्वाचा सहभाग आहे.’ शास्त्रज्ञ प्रा. भालचंद्र जोशी यांनी सांगितला की, ‘गुरूत्वीय लहरींचा परिणाम पल्सार ताऱ्यांच्या नोंदीवर होत असल्याचे निरीक्षण आईन्स्टाईनने नोंदविले होते. अतिशय सुक्ष्म निरीक्षणांसाठी जीएमआरटीच्या नोंदींचा उपयोग झाला आहे.’

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2