विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; अधिष्ठाता नियुक्ती ,गुणवाढ प्रकरणाने अधिसभा गाजली 

विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यापीठाचा 2024-25 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर केला.

विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; अधिष्ठाता नियुक्ती ,गुणवाढ प्रकरणाने अधिसभा गाजली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)अधिष्ठाता पदाच्या नियुक्त्या रखडल्याने (Dean appointments stopped)अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ अधिष्ठाता नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी,अशी मागाणी विद्यापीठ आधिसभा सदस्यांनी शनिवारी अधिसभेच्या बैठकीत केली.तसेच एका परदेशी विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवण्यात (Marks increase by taking money from foreign students)आले असल्याचे निवेदन विद्यापीठाला देण्यात आले आहे. मात्र,त्यावर कारवाई केली जात नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले.तसेच 528 कोटी जमेचा आणि 627 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर (Budget presented)करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर व प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांच्या उपस्थित अधिसभेचे कामकाज पार पडले.त्यात विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यापीठाचा 2024-25 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर केला.विविध सदस्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतानंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 

हेही वाचा : विद्यापीठ अधिसभा सदस्यांवर आंबेकरांनी आणला हक्कभंग; विद्यापीठाची बदनामी कारण्यावरून सभागृह तापले

दरम्यान,एका परदेशी विद्यार्थ्यांला रविवारी विद्यापीठात बोलावून त्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर लिहून घेण्यात आला.तसेच त्यांचा पेपर चेक करून त्याचे गुण वाढवण्यात आले,असा आरोप अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर यांनी अधिसभेत केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे परीक्षा विभागाशी संबंध नसलेला व्यक्ती परीक्षा विभागात येऊन पेपर चेक करते आणि विद्यार्थ्यांचे गुण वाढवतो,हे नियमबाह्य असल्याने यांची चौकशी करावी,अशी मागणी सचिन गोर्डे पाटील यांनी केली. त्यावर सभागृहात एकाच गदारोळ झाला. अशा पद्धतीने गुण बदलले जात असलीत तर त्यांची चौकशी झाली पाहिजे.त्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापना करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ.गजानन खराटे यांनी केली.

विद्यापीठाला पूर्णवेळ अधिष्ठाता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अधिष्ठाता यांची नियुक्ती तात्काळ करावी,अशी मागणी अधिसभा  सदस्य डॉ.गजानन खराटे यांनी केली.त्यावर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, अधिष्ठाता नियुक्तीच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया राबवली जात आहे.शासनाकडून लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित पद एक एकल आहे की नाही, याबाबत उच्च शिक्षण विभागाकडून अभिप्राय मागवला आहे.त्यानंतर तात्काळ नियुक्तीची प्रक्रिया राबवली जाईल.

----------------------------------------------