NEET आणि MHT-CET परीक्षा एकाच दिवशी आल्याने तारखेत बदल.. दोन दिवसांत निर्णय बदलण्याची नामुष्की

५ मे रोजी होणारी MHT-CET (PCM गट) परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

NEET आणि  MHT-CET परीक्षा एकाच दिवशी आल्याने तारखेत बदल.. दोन दिवसांत निर्णय बदलण्याची नामुष्की

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षाकडून दोन दिवसांपूर्वी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) साठी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध (Revised schedule released) करण्यात आले. मात्र, त्यास दोन दिवस उलटले नाही तेच निर्णय बदलण्याची नामुष्की सीईटी सेलवर ओढावली आहे. कारण येत्या ५ मे रोजी होणारी MHT-CET (PCM गट) परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सीईटी सेलने म्हटले आहे की, सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी की MHT-CET (PCM गट) परीक्षा 05-05-2024 रोजी घेतली जाणार नाही, कारण NEET – UG परीक्षा 05-05-2024 रोजी आहे. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. त्यामुळे ५ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. 

दोन दिवसांपुर्वीच अभियांत्रिकी, एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले. MHT CET भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) परीक्षा 22 ते 30 एप्रिल आणि PCM परीक्षा 2 ते 16 मे या कालावधीत होणार आहेत, असे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, PCM ग्रुपची ५ मे रोजी होणारी परीक्षेची तारीख बदलण्यात येणार आहे. 

दोन दिवसांपुर्वी प्रसिद्ध केलेले वेळापत्रक 

MHTCET पीसीबी गट : परीक्षा 22 एप्रिल, 23 एप्रिल, 24 एप्रिल, 28 एप्रिल, 29 एप्रिल, 30 एप्रिल रोजी होणार आहेत. पीसीएम गट : 2 मे, 3 मे, 4 मे, 5 मे, 9 मे, 10 मे, 11 मे, 15 मे, 16 मे रोजी.  MAH-AAC CET रविवार, 12 मे , MAH-B.A./B.Sc. बीएड (चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) - सीईटी शुक्रवार, १७ मे, MAH- LL.B.5 वर्षे सीईटी (पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) शुक्रवार, १७  मे, MH- नर्सिंग CET शनिवार, 18 मे , MAH-BHMCT CET बुधवार, 22 मे, MAH-B.BCA/BBA/BMS/BBM-CET सोमवार, 27 मे मंगळवार २८ मे आणि बुधवार, 29 मे २०२४ रोजी होणार आहेत. तर  MAH-PGP-CET/PGO-CET/M.Sc(A & SLP)-CET M.Sc(P & O)-CET तारीख नंतर जाहीर होणार आहे.

यापुर्वी पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही श्रेणींसाठी एमएचटी सीईटी परीक्षा 2024 पूर्वी 16 ते 30 एप्रिल दरम्यान विविध तारखांना होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठीच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत आयोजित निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने MHT CET परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, एकच दिवस मध्ये गेली की, पुन्हा एकदा परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची नामुष्की सीईटी सेलवर ओढावल्याचे पाहायला मिळाले.